स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीपासून मुक्तता!

rbi-repo

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत रिझर्व्ह बँकेने गृहकर्जधारांना सुखद धक्का दिल्यानंतर आणखी एक आनंदी निर्णय घेतला आहे. १० लाखांपर्यंतचं गृहकर्ज घेणाऱ्यांची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीतून आरबीआयने सुटका केली आहे. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीचा गृहकर्जातच समावेश करावा, असा महत्त्वाचा आदेश आरबीआयने बँकांना दिला.
सध्या गृहकर्ज घेणाताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या १५ टक्के अतिरिक्त खर्चामुळे बऱ्याचदा कर्जदारांची तारांबळही उडते.या रक्कमे अभावी काही जणांची घर घेण्यास दिरंगाई होते. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेता यावं यासाठी आरबीआयने हा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या रक्कमेचा समावेश गृहकर्जातच करावा असं असे आदेशच आरबीआयने सर्व बँकांना दिले आहेत. पण आरबीआयच्या या निर्णयाचा फयादा फक्त १० लाखांपर्यंतचं गृहकर्ज घेणाऱ्यांनाच द्यावा, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.कर्जदारांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांसाठी घेतलेल्या कर्जाचे मूल्य (एलटीव्ही) काढताना बॅंका स्टॅंप ड्यूटी, रजिस्ट्रेशन आणि इतर दस्तऐवजांचे शुल्क समाविष्ट करू शकतात’, असं रिझर्व्ह बॅंकेने एका निवेदनाद्वारे नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>