Tag Archives: Builders Issue in housing society

स्टॅम्प ड्युटीचा भार हलका

बड्या कॉम्प्लेक्समधील रिकामे फ्लॅट आणि विकासकाकडून देण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांवर भराव्या लागणाऱ्या लाखो रुपयांच्या अनावश्यक स्टॅम्प ड्युटीतून हाऊसिंग सोसायट्यांची अखेर सुटका झाली आहे. अनेक वर्षांपासून होणाऱ्या या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली असून या निर्णयामुळे हजारो सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Continue reading

राज्यातले बिल्डरराज ढासळणार!

Maharashtra Times  -Dec 27, 2013, 04.17AM IST

महाराष्ट्र सरकारने २०१२मध्ये मंजूर केलेला आणि केंद्र सरकारने बिल्डरधार्जिणा ठरवून यापूर्वी नाकारलेला महाराष्ट्र गृहनिर्माण (नियमन व विकास) अधिनियम महाराष्ट्रात अंमलात आणण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा लागू झाल्यावर ग्राहकांची दिशाभूल करणा – या बिल्डरांना १० लाख रुपये दंड किंवा तीन वर्षांपर्यंत कारावास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकेल. यासाठी गृहनिर्माण नियामक आयोग स्थापन केला जाईल. ग्राहकांची‌ दिशाभूल होऊ नये म्हणून बिल्डरांना प्रकल्पाची सर्व माहिती आधीच जाहीर करावी लागेल आणि बांधकामाचा एकदा निश्चित केलेला दर आपल्या लहरीनुसार बदलता येणार नाही.

Continue reading